

amruta prakash
esakal
दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी आपल्या चित्रपटात प्रेमाची जी परिभाषा सांगितली ती पाहून अनेक तरुण मुलामुलींच्या मनात प्रेमाची फुलं उमलली. त्यांनी 'मैने प्यार किया', 'हम आपके हैं कौन..!, 'हम साथ साथ हैं', 'मैं प्रेम की दिवानी हूं' यांसारखे चित्रपट बनवले. या चित्रपटांसोबतच अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे 'विवाह'. एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा आणि साध्या कुटुंबातील मुलीच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचा सुंदर प्रवास आणि त्यांच्यातील प्रेम दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भावला होता. यात अभिनेता अमृता राव आणि शाहिद कपूर याच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र त्यांच्यासोबत अमृताची बहीण दाखवलेली अभिनेत्री तुम्हाला आठवतेय का? आता ती अभिनेत्री कशी दिसतेय ठाऊक आहे?