

chimani pakhara
ESAKAL
२००१ मध्ये प्रदर्शित झालेला 'चिमणी पाखरं' हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला. एक दर्जेदार कौटुंबिक चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं. त्याकाळी थिएटरमध्ये या सिनेमाने सर्व प्रेक्षकांना अक्षरशः रडवलं होतं. या चित्रपटात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर हे मुख्य भूमिकेत होते. तसेच बाळ धुरी, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश देव, जयश्री गडकर, रेशम टिपणीस, तुषार दळवी यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. मात्र या सगळ्यात विशेष भाव खाल्ला होता तो या चित्रपटातील मुलांनी.