मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध कलाकारांबद्दल अनेक अफवा, खोट्या बातम्या पसरवल्या जातात. अनेक कलाकारांना मानसिक मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार घडला तो प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस हिच्यासोबत. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटलय की, 'माझ्या मुलाबद्दल खोटी अफवा पसवणाऱ्यावर मी कठोर कारवाई करणार आहे.'