

RESHMA SHINDE
ESAKAL
'रंग माझा वेगळा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करतेय. तिने अनेक मालिकांमध्ये आपली छाप पडलीये. स्टार प्रवाह वाहिनीवरील टॉप अभिनेत्रींच्या यादीत रेश्माचा समावेश होतो. ती जानकी बनून सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. रेश्मा २९ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. रेश्माचा नवरा पवन हा साऊथ इंडियन आहे. ती नेहमीच तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहतेही त्यांच्या फोटोची आतुरतेने वाटपाहताना दिसतात. आता एका मुलाखतीत रेश्माने पवन तिला कोणत्या नावाने हाक मारतो याबद्दल सांगितलं आहे.