

GHAROGHARI MATICHYA CHULI
esakal
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच स्टार प्रवाह वाहिनीने आणखी तीन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. मात्र या मालिकांसाठी जुन्या मालिका निरोप घेणार आहेत. नुकताच 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या वेळेवर आता 'वचन दिले तू मला' ही मालिका सूरू होणार आहे. अशाच एका नव्या मालिकेसाठी आता 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका निरोप घेणार अशी चर्चा सुरू झालीये. कोणती आहे ती मालिका?