Sushant Singh Rajput case : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला ‘CBI’कडून क्लीन चिट, मात्र आता...

Rhea Chakraborty receives clean chit in the Sushant Singh Rajput case : जाणून घ्या, या प्रकरणात सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी काय भूमिका घेतली आहे?
Rhea Chakraborty receives clean chit in the Sushant Singh Rajput case, while SSR’s family prepares to legally challenge the CBI’s closure report.

Rhea Chakraborty receives clean chit in the Sushant Singh Rajput case, while SSR’s family prepares to legally challenge the CBI’s closure report.

esakal

Updated on

Sushant Singh Rajput’s family challenges the CBI closure report : सीबीआयच्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे आणि रिया चक्रवर्ती किंवा इतर कोणत्याही आरोपीविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. तसेच अहवालात असेही म्हटले आहे की रियाने सुशांतच्या पैशांचा किंवा वस्तूंचा गैरवापर केला नाही आणि सुशांत स्वतः तिला कुटुंब म्हणून संबोधत होता. 

तर सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाने सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला वरवरचा आणि अपूर्ण म्हणत न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाच्या वकिलांचा आरोप आहे की, सीबीआयने आरोपपत्रात सहाय्यक कागदपत्रे जोडली नाहीत. वकिलाचा असा दावा आहे की तपास यंत्रणेने अनेक महत्त्वाचे पुरावे दुर्लक्षित केले.

सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील वरुण सिंग यांनी म्हटले आहे की, सीबीआयचा अहवाल अपूर्ण आहे. जर सीबीआयला सत्य दाखवायचे असेल तर त्यांनी चॅट्स, साक्षीदारांचे जबाब, बँक रेकॉर्ड आणि वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करायला हवे होते. ही चौकशी केवळ बनावट आहे. आम्ही याविरुद्ध न्यायालयात निषेध याचिका दाखल करू."

Rhea Chakraborty receives clean chit in the Sushant Singh Rajput case, while SSR’s family prepares to legally challenge the CBI’s closure report.
Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना! उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

 सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने मार्चमध्ये पाटणा न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली आहे. तर सुशांतच्या कुटुंबाने रिया आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्याबाबत सीबीआयने पाटणा न्यायालयात आणि रियाने सुशांतची बहीण आणि कुटुंबाविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याबाबत मुंबई न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे.

Rhea Chakraborty receives clean chit in the Sushant Singh Rajput case, while SSR’s family prepares to legally challenge the CBI’s closure report.
flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

या क्लोजर रिपोर्टनुसार, सुशांतने आत्महत्या केली आणि रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला या प्रकरणात पूर्ण क्लीन चिट देण्यात आली आहे. सीबीआयच्या तपासात असे दिसून आले की सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com