
Bollywood News : २०२४ साली प्रदर्शित झालेला ‘क्रू’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळी मेजवानी ठरला. करीना कपूर खान, तब्बू आणि कृति सेनॉन यांनी साकारलेल्या प्रमुख भूमिका, तसेच विनोदी शैलीत गुंफलेली थरारक कथा यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवला. महिलाप्रधान कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना हसवत, विचार करायला लावणारा ठरला.