

rinku rajguru on akash thosar
ESAKAL
'सैराट' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर. या चित्रपटाने जगभरात नाव कमावलं. १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र याच चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला चार नवे चेहरे दिले. त्यातलेच दोघे म्हणजे रिंकू आणि आकाश. अरची आणि परशाची भूमिका साकारणाऱ्या या कलाकारांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. मात्र त्यासोबतच अनेकदा त्यांच्यातील नात्याची चर्चाही रंगते. अशातच आता रिंकूने त्यांच्यात असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे.