

RINKU RAJGURU
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलंच सोबतच तिने अभिनयातही वेगवेगळे प्रयोग केले. रिंकू कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. आताही तिने शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय. रिंकूने काही दिवसांपूर्वी आपल्या आयुष्यात कुणीतरी असल्याचं सांगितलं होतं. आता तिने त्याचा चेहराही प्रेक्षकांना दाखवलाय.