
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या चित्रपटांप्रमाणे तिचं वैयक्तिक आयुष्यही कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा रिंकू चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. यावेळेस कारण तिच्या लग्नाचं आहे. रिंकूचं लग्न ठरतंय का असा प्रश्न सध्या चाहते विचारताना दिसतात. त्याचं कारण म्हणजे तिचा आणि कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या मुलाचा व्हायरल होणारा फोटो.