
'सैराट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. अख्ख्या महाराष्ट्राला तिने भुरळ घातली. 'आर्ची' बनून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतरही तिने अनेक सिनेमे दिले. तिच्या 'झिम्मा २' च्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. आता रिंकू पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला सज्ज आहे. तिचा 'बेटर हाल्फ' हा नवीन चित्रपट येतोय. यात ती सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासोबत दिसणार आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत रिंकूने तिला कसा नवरा हवाय याबद्दल माहिती दिलीये.