rinku rajguru
rinku rajguru esakal

इंग्लिश येणारी माणसं खूप शहाणी हे... उगीच इंग्रजीत बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल रिंकू राजगुरूने मांडलं मत, म्हणाली- मराठीत

Rinku Rajguru Talked About English Marathi Controversy : लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने उगीच इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तींना सुनावलं आहे. मला त्यात कसलाही रुबाब वाटत नाही असं ती म्हणाली आहे.
Published on

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रिंकूने आपल्या अभिनायासोबतच आपल्या सौंदर्यानेदेखील चाहत्यांना भुरळ घातली. 'सैराट', 'झिम्मा २', 'कागर' या चित्रपटात ती झळकली. मात्र सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती मराठी आणि इंग्रजी भाषेबद्दल मत मांडताना दिसतेय. आता माणसं उगीच इंग्रजीत बोलतात. इंग्रजी बोललं म्हणजे आपण खूप मोठे झालो असं त्यांना वाटतं. मात्र आपल्याला मराठी भाषेतच रुबाब वाटतो. आपल्याला जेवढी येते तेवढी इंग्रर्जी मी बोलते स रिंकू म्हणालीये.

रिंकूने झी मराठीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सुबोध भावेच्या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली, 'खूप जण म्हणतात की इंग्रजी आलं पाहिजे. मी मान्य करते ते खूप महत्वाचं आहे.पण इंग्रजी येणारी माणसं म्हणजे खूप शहाणी, त्यांना खूप जास्त समजतं, आणि इंग्लिश म्हणजे एक स्टॅण्डर्ड झालाय असं लोक वागवतात बऱ्याचदा. पण मला त्याने काही फरक पडत नाही. माझी कुवत किंवा अनेकांची कुवत जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आहे. जितका करता येईल तितका प्रयत्न करतो. भाषेपेक्षा मला वाटतं आपण एकमेकांच्या भावना समजून घेणं त्या माणसाला समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे.'

rinku rajguru
का बिघडलं ऐश्वर्या राय-जया बच्चन यांचं नातं? कधीकाळी सुनेला मैत्रीण म्हणत केलेलं कौतुक, ती व्यक्ती ठरली कारण

ती पुढे म्हणाली, 'मला कळत नाही आजकाल मराठी माणूस पण समोर आलं की काय इंग्लिशमध्ये बोलतो. विनाकारण, काहीच कारण नसतं. त्याला मराठी येतं, मला मराठी येतं. ते फॅशन झाल्यासारखं मला वाटतं ते इंग्लिशचं झालंय. मला काही त्यात रुबाब वाटत नाही. मला माझ्या मराठीत जितका रुबाब वाटतो तितका इंग्रजीत वाटत नाही.' रिंकूच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही तिची बाजू घेत तीला पाठिंबा दिलाय.

rinku rajguru
'आई कुठे काय करते' घेणार निरोप पण एका भागासाठी कलाकारांना किती मिळत होतं मानधन?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com