अभिनेत्री रिंकू राजगुरु हिचा मोठा चाहतावर्ग आहे. आज देखील चाहत्यांमध्ये आर्चीची क्रेझ तितकीच आहे. रिंकू म्हणजेच आर्ची सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. अशातच आता रिंकू राजगुरू वारीत सहभागी झाली होती. तिने वारीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती विठूनामाच्या गजरात तल्लीन झालीय.