

rinku rajguru
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिने 'सैराट' मधून सिनेसृष्टीत स्थान मिळवलं. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले. त्यातील पात्रही प्रेक्षकांची मन जिंकून गेली. 'तिचा झिम्मा २' मधला अभिनय देखील चर्चेचा विषय ठरला. आता मात्र रिंकू एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिने ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या एव्हरग्रीन गाण्यावर दिलखेचक असा डान्स केलाय. जो पाहून प्रेक्षक भारावून गेलेत. यात तिच्यासोबत लावणीकिंग आशिष पाटील आहे. या गाण्यातील तिच्या अडा पाहून चाहते घायाळ झालेत.