Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील दमदार, हँडसम अभिनेते म्हणजे ऋषी कपूर. काही वर्षांपूर्वी ऋषी यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनात त्यांचं स्थान टिकून आहे. ऋषी यांचा आज 4 सप्टेंबरला वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्या काही खास आठवणी.
ऋषी कपूर कायमच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांचं सडेतोड बोलणं कायमच काही ना काही वाद सुरु करायचं. पण तुम्हाला माहितीये का ? ऋषी स्वतःचंच लग्नात बेशुद्ध पडले होते. काय आहे ही आठवण ? जाणून घेऊया.
नीतू आणि ऋषी यांनी 22 जानेवारी 1980 रोजी कपूर कुटुंबाच्या चेंबूर येथील प्रसिद्ध घरी- आरके हाऊसमध्ये थाटात लग्न केलं. त्यांच्या या आलिशान लग्नसोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. फक्त चित्रपटसृष्टीतीलच नाही तर विविध क्षेत्रातील लोकांनीही हजेरी लावली होती.
नीतू कपूर यांनी त्यांच्या लग्नाची आठवण एका मुलाखतीत सांगितली. त्यांनी सांगितलं कि त्यांच्या लग्नात एवढी लोकं हजर होती कि ती गर्दी बघून ते दोघंही भर लग्नात बेशुद्ध झाले होते. शेवटी त्यांना एका खोलीत नेऊन शांत करण्यात आलं. स्वतःला शांत ठेवण्यासाठी ते दोघंही ब्रँडी पीत होते. त्यामुळे फेरे घेताना नीतू नशेत होत्या अशी आठवण त्यांनी सांगितली.
ऋषी कपूर यांना उत्तम इंग्रजी यायचं. याबद्दल नीतू यांनी सांगितलं कि, जेव्हा कधी आमच्यात भांडण व्हायचं तेव्हा ऋषी एखादा कठीण शब्द बोलायचे आणि त्यामुळे मला कळायचं नाही पुढे काय बोलावं आणि मी गप्प बसायचे आणि नंतर डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ शोधायचे. त्यामुळे त्यांच्यातील बरीच भांडण टळायची.
ऋषी कपूर आणि नीतू कपूर खेल खेल में, अमर अकबर अँथनी, कभी कभी, झूठा कहीं का आणि धन दौलत यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्या दोघांना रिधिमा आणि रणबीर ही दोन मुलं आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.