Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Rishi Kapoor: ऋषी कपूर यांच्या आठवणीत त्यांची लेक रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) आणि पत्नी नीतू कपूर (Neetu Kapoor) या भावूक झालेल्या आहेत.
Rishi Kapoor
Rishi Kapoor esakal

Rishi Kapoor: दिवंगत नेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनाला चार वर्ष झाली आहे. आज त्यांची डेथ अॅनिवर्सरी आहे. ऋषी कपूर यांचे चाहते आजही त्यांचे चित्रपट लोक आवडीनं बघतात. ऋषी कपूर यांच्या आठवणीत त्यांची लेक रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) आणि पत्नी नीतू कपूर (Neetu Kapoor) या भावूक झालेल्या आहेत. दोघींनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

रिद्धिमाने शेअर केली भावनिक पोस्ट

रिद्धिमाने ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रिद्धिमाने कॅप्शनमध्ये लिहिलं, "ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्यापासून दूर जात नाहीत, ते रोज आपल्यासोबत फिरतात. तुझी खूप आठवण येते." नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रिद्धिमाची पोस्ट रिपोस्ट केली.

Rishi Kapoor
Rishi KapoorESAKAL
Rishi Kapoor
Ranbir Kapoor And Rishi kapoor:...म्हणून रणबीरनं खाल्ला होता ऋषी कपूर यांचा मार; स्वत:च सांगितला किस्सा

रिद्धिमाचा पती, भरत साहनी यांनीही सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला.या फोटोमध्ये रणबीर कपूर, ऋषी कपूर, नीतू आणि कृष्णा राज कपूर हे सर्वजण दिसत आहेत.

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या कॉलबद्दल रिद्धिमानं सांगितलं

रिद्धिमाने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ऋषी कपूर यांनी निधनाच्या दोन दिवस आधी तिला फोन केला होता, हे सांगितलं. रिद्धिमानं सांगितलं की, त्यांनी तिला कॉल केला पण ती त्यांचा कॉल ती उचलू शकली नाही. रिद्धिमा म्हणाली होती, "त्यांचा तो मिस कॉल शेवटचा होता. आता मी विचार करते की, मी तो कॉल उचलायला पाहिजे होता.मी त्या मिस कॉलचा स्क्रिनशॉट अजूनही माझ्या फोनमध्ये सेव्ह केला आहे."

30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. ते कर्करोगाने त्रस्त होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com