

rishi manohar
esakal
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने नवे चेहरे दाखल होत असतात. काही कलाकार आपल्या पहिल्याच भूमिकेतून लक्ष वेधून घेतात, तर काही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. या नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता ऋषी मनोहर. रंगभूमीवर आपल्या अभिनयाची पक्की पायाभरणी करणाऱ्या ऋषीने विविध माध्यमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'दादा, एक गुड न्यूज आहे’ नाटक आणि 'पेट पुराण' सारख्या वेबसिरीज मधून त्याच्या सहज अभिनयाची, प्रभावी स्क्रीन प्रेझेन्सची आणि पात्रांमध्ये समरस होण्याच्या क्षमतेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.