Tujhe Meri Kasam: रितेश आणि जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम' ओटीटी अन् टीव्हीवर का नाही? रामोजी राव आहेत यामागचे मास्टरमाइंड

Genelia Deshmukh And Riteish Deshmukh: 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातील गाणी लोक आजही आवडीनं बघतात पण हा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला नाही.
रितेश आणि जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम' ओटीटी अन् टीव्हीवर का बघायला मिळत नाही? रामोजी राव आहेत यामागचे मास्टमाइंड
Tujhe Meri Kasamsakal

Tujhe Meri Kasam: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखची (Genelia Deshmukh) यांचा 'तुझे मेरी कसम' (Tujhe Meri Kasam) हा चित्रपट 11 वर्षांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटातून रितेश आणि जिनिलिया यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. रितेश आणि जिनिलिया यांच्यासाठी हा चित्रपट खास ठरला कारण या चित्रपटादरम्यानंच त्यांच्या लव्ह स्टोरीला खरी सुरुवात झाली. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातील गाणी लोक आजही आवडीनं बघतात पण हा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला नाही. तसेच हा चित्रपट टीव्हीवर देखील दाखवला जात नाही, यामागचे नेमके कारण काय आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

अनेक नवे-जुने चित्रपट ओटीटीवर रिलीज केले जातात. तसेच काही चित्रपट टीव्हीवर देखील दाखवले जातात पण रितेश आणि जिनिलिया यांचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट ना ओटीटीवर रिलीज झाला ना तो टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला. यामागचे कारण आहेत दिवंगत चित्रपट निर्माते रामोजी राव. रामोजी राव हे 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाचे निर्माते होते. या चित्रपटाचे डिजिटल अधिकार त्यांनी विकले नाहीत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्येच जावे लागलं. रामोजी राव यांनी या चित्रपटाचे डिजिटल राइट्स विकले नाहीत त्यामुळे कोणतेही चॅनल किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट दाखवू शकत नाही.

तुझे मेरी कसम
Tujhe Meri Kasamsakal

रितेशवर करण्यात आले होते आरोप

2003 हा काळ केबल ऑपरेटर्सचा होता. तेव्हा सीडी आणि डीव्हीडी कॅसेटद्वारे पायरसी याची चिंता चित्रपटाच्या टीमला होती. रितेश देशमुखने आपल्या वडिलांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना केबल ऑपरेटर्सना तुझे मेरी कसम न दाखवण्यासाठी धमकावण्यास सांगितले होते, असा आरोप रितेशवर करण्यात आला होता. केबलवर पायरसीच्या माध्यमातून तुझे मेरी कसम प्रसारित झाल्यास त्यांचे परवाने जप्त केले जातील, असा इशारा त्यांनी दिला होता, असंही म्हटलं गेलं. पण नंतर ही सर्व अफवा असल्याचे उघड झाले.

रितेश आणि जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम' ओटीटी अन् टीव्हीवर का बघायला मिळत नाही? रामोजी राव आहेत यामागचे मास्टमाइंड
Riteish Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखला अश्रू अनावर; मोठ्या भावाने येऊन सावरलं, आईच्या डोळ्यातही अश्रू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com