

bigg boss marathi 6
ESAKAL
छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची नांदी होतेय. अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीने त्यांच्या नव्या मालिकांची घोषणा केलीये. तर काही मालिका भेटीला सुद्धा आल्यात. मात्र प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तो कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी'. येतंय ११ तारखेपासून 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनमध्ये कोणकोणते पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतीच या कार्यक्रमाची पत्रकार परिषद पार पडली. त्यात रितेशला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यात रितेशला यंदा 'बिग बॉस मराठी' मध्ये कोणता नेता दिसणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही रितेशने उत्तर दिलंय.