![विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश देशमुख भावूक; शेअर केली खास पोस्ट](http://media.assettype.com/esakal%2F2024-05%2F16d76cd2-c60e-42f9-9ba6-9c0fec848042%2Fdeshmukh.jpg?rect=0%2C0%2C1280%2C720&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Riteish Deshmukh: विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं या पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले आहे.
रितेशनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये जिनिलिया आणि त्याची मुलं ही विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करताना दिसत आहे. या फोटोला रितेशनं कॅप्शन दिलं, "हॅप्पी बर्थ-डे पप्पा", या फोटोच्या बॅकग्राऊंडला 'पापा मेरी जान' हे गाणं ऐकू येत आहे.
चार वर्षांपूर्वी रितेशनं विलासराव देशमुख यांच्या जयंतीला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले होते. या व्हिडीओमध्ये रितेश भावूक झालेला दिसला. 'अभी मुझमे कही' या गाण्यावरील व्हिडीओमधून रितेशनं वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
विलासराव देशमुख यांचे 2012 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशमुख कुटुंबावर शोककळा पसरली. विलासराव यांना रितेश देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख ही मुलं आहेत. यामधील अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे राजकीय नेते आहेत, तर रितेश हा अभिनय क्षेत्रात काम करतो.
रितेश लवकरच बिग बॉस मराठी या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रितेशचा राजा शिवाजी हा चित्रपट देखील लवकरच रिलीज केला जाणार आहे. रितेश आणि जिनिलिया यांनी त्यांच्या या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. रितेश आणि जिनिलिया यांचा वेड हा हिट ठरला. वेड या चित्रपटाच्या यशानंतर आता रितेशचा राजा शिवाजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.