

riteish deshmukh
esakal
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. ते दोघे प्रेक्षकांचे लाडके दादा वहिनी आहेत. इतरांना कपल गोल्स देणारी ही जोडी २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकली होती. त्यांना दोन मुलं देखील आहेत. आज २५ नोव्हेंबर रोजी त्यांचा मोठा मुलगा रिआन याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रितेशने त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केलीये. लाडक्या लेकासोबतचे काही फोटो शेअर करत रितेशने भावनिक पोस्ट लिहिलीये.