

riteish deshmukh genelia deshmukh
esakal
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. या मराठी चित्रपटाने 'सैराट' नंतर १०० कोटी कमावण्याचा रेकॉर्ड केलाय. त्यामुळे सगळीकडे सध्या याच चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटात रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलीये आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखने महाराणी सईबाईंची. त्यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. त्यांच्या लग्नाला जवळपास १५ वर्ष झाली आहेत. मात्र ते अजूनही नव्या जोडप्याप्रमाणेच दिसतात. तुम्हाला त्यांच्या लग्नातली एक गंमत माहितीये का? लग्नात रितेश जिनिलियाच्या चक्क ८ वेळा पाया पडला होता.