

riteish deshmukh
ESAKAL
अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनद्वारे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागील सीझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर, यंदाचा नवा सीझन आणखी वेगळ्या संकल्पनेसोबत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘अनेक दारं’ ही यंदाची थीम असून, हे दरवाजे स्पर्धकांच्या प्रवासाची दिशा ठरविणार आहेत. हा कार्यक्रम ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता कलर्स वाहिनी आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. रितेशची स्पष्ट मतं आणि स्पर्धकांशी असलेली थेट संवादशैली प्रेक्षकांना नेहमीच भावते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या सीझनबाबतची तयारी, मागील सीझनच्या यशामागची कारणं आणि रणनीती याविषयी रितेशबरोबर साधलेला हा खास संवाद...