

riteish deshmukh diwali photos
esakal
महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. सोबतच त्यांच्या वागण्यानेदेखील ते चाहत्यांचे आवडते बनले. चाहते कायमच त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. नुकतीच दिवाळीची सुरुवात झालीये. आणि देशमुख कुटुंबीयदेखील ही दिवाळी जोरदार पद्धतीने साजरी करता आहेत. या दिवाळीसाठी रितेश आणि जिनिलिया त्यांच्या पारंपरिक घरात म्हणजे लातूरमधील बाभळगाव येथील घरी पोहोचलेत. इथे त्यांनी इतर दोन भावांसोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळी साजरी केलीये. त्यांचे फोटोही त्यांनी शेअर केलेत.