RUtuja Bagwe transformatio
esakal
MARATHI ACTRESS RUTUJA BAGWE FITNESS JOURNEY: मनोरंजनविश्वात असे अनेक सेलिब्रिटी असतात, जे आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असतात. एखाद्या भूमिकेसाठी ते वजन वाढवतात, तर कधी कमीही करतात. अनेक सेलिब्रिटीचं ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांना प्रेरणा देणारं ठरतं. त्यातच काही दिवसापूर्वी वनिता खरातने तिचे काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये तिने तब्बल २८ किलो वजन कमी केल्याचं दिसून आलं. त्यानंतर तिचं खूप कौतूक झालं. दरम्यान आता वनितानंतर दुसऱ्या एका अभिनेत्रीनं वजन कमी करत ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केलेत. तिचे फोटो पाहून अनेक जण आवाक झालेत.