
rohini hattangadi in tharla tar mag
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र या मालिकेतील पुर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं महिन्याभरापूर्वी निधन झालं. त्यांची ही भूमिका अतिशय गाजली होती. त्या अनेकांच्या लाडक्या होत्या. मात्र त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर पुर्णा आजीच्या भूमिकेत कोण दिसणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली आहे. या अभिनेत्री आहेत रोहिणी हट्टंगडी. आता मालिकेत ज्योती यांची जागा घेण्याबद्दल रोहिणी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.