Gandhi Movie: ऑस्करविजेत्या 'गांधी' सिनेमाचा 'तो' सीन शूट करताना रोहिणी हट्टंगडी झोपल्या, शेअर केली खास आठवण

ज्या सिनेमाचं जागतिक स्तरावर कौतुक झालं तो सिनेमा म्हणजे गांधी. गांधी सिनेमात त्यांनी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची भूमिका त्यांनी साकारली.
Gandhi Movie
Gandhi Moviesakal

मराठीसोबतच बॉलिवूड आणि हॉलिवूडही गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी. रोहिणी या एकमेव भारतीय अभिनेत्री आहेत ज्यांना ब्रिटिश अकॅडेमीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.(British Academy Award for Best Supporting Actress)

रोहिणी यांनी आजवर अनेक वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमात काम केलं. पण त्यांच्या ज्या सिनेमाचं जागतिक स्तरावर कौतुक झालं तो सिनेमा म्हणजे गांधी. गांधी सिनेमात त्यांनी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची भूमिका त्यांनी साकारली. Rohini Hattangadi news

बेन किंग्सले आणि रोहिणी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमाला ऑस्कर पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आलं. या सिनेमाची एक खास आठवण त्यांनी एका मुलाखतीत शेअर केली.

अनफिल्टर्ड बाय समदिश या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांना गांधी सिनेमाचं शूट करताना त्यांचा अनुभव कसा होता असा प्रश्न विचारण्यात आला.

Gandhi Movie
दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी मुलाखत | Ata Vel Zali | Entertainment

त्यावेळी त्यांनी ब्रिटिश कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांचं खूप कौतुक केलं. सोबतच एक किस्सा त्यांनी शेअर केला. "आम्ही आगा खान पॅलेस मध्ये शूट करत होता. कस्तुरबांच्या मृत्यूचा सीन होता आणि मला डोळे मिटून झोपायचं होतं. तिथे इतकी शांतता होती कि मला डुलकी लागली आणि तितक्यात माझा दिग्दर्शक रिचर्डने हळू आवाजात ऍक्शन म्हंटलं.

मला तेव्हढ्याशा आवाजानेही जाग आली आणि मी पटकन डोळे उघडले त्यावेळी तो म्हणाला,'रोहिणी तुझे डोळे बंद हवेत. तुझा मरणाचा सीन आपण शूट करतोय' मी ओके म्हंटलं. मी थोडीच त्याला सांगू शकत होते कि माझा डोळा लागला होता." हा किस्सा शेअर करत त्या हसू लागल्या.

यासोबतच त्यांनी कस्तुरबांविषयीचं सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,"मी जेव्हा कस्तुरबांची भूमिका करायची ठरवली तेव्हा मी त्यांच्याविषयी काही वाचायला मिळत आहे का शोधत होते. त्यावेळी मला दिल्लीला फक्त कस्तुरबांवर दोन पुस्तकं मिळाली.

Gandhi Movie
Rohini Hattangadi: 'मला रणवीरपेक्षा रणबीर जरा जास्त आवडतो..', कारण सांगत रोहिणी हट्टंगडी जरा स्पष्टच बोलल्या

एक म्हणजे 'बा और बापू कि शीतल छाया में' हे पुस्तक सुशीला नायर यांचं आणि 'हमारी बा' हे मनमाला बेन पारेख यांचं पुस्तक. खरंतर गांधीही सतत प्रवास करत असायचे त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत आश्रमाची देखभाल करणं, तेथील लोकांना जोडून ठेवणं, त्या माणसांची काळजी घेणं हे कस्तुरबांचं काम असायचं.

दुसरं म्हणजे कस्तुरबा यांच्या आयुष्यात इतके बदल घडले. पहिले ते पोरबंदरला राहायचे तिथून ते आफ्रिकेला गेले. आफ्रिकेला असताना त्यांना पारशी पद्धतीच्या साड्या नेसणं शिकायला लागलं, त्या हिल्सचे चप्पल वापरू लागल्या. काट्या-चमच्याने कसं जेवायचं हे त्या शिकल्या. त्यात त्यांच्या मुलांचं शालेली शिक्षण झालं नाही. गांधीजी सतत जेलमध्ये असल्याने त्यांना इंग्रजी शिकवायला टीचर यायची.

Gandhi Movie
रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पदक

पण त्यांच्याकडून कस्तुरबा इंग्रजी शिकल्या नाहीत. गांधीजींनी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्या शिकल्या नाहीत. पण त्यांनी गांधीजींचे विचार आत्मसात केले. वेळप्रसंगी त्यांनी गांधीजींसमोर योग्य मुद्देही मांडले. गांधीजींशी बोलण्यातून, त्यांच्या कृतीतून कस्तुरबा घडल्या. कस्तुरबा गांधीजींसोबत स्वातंत्र्यलढ्यात फरफटत गेल्या नाहीत तर त्या त्यांच्या सोबत गेल्या. त्यांनी स्वतःहून तो मार्ग निवडला."

दरम्यान रोहिणी यांनी आजवर वेगवेगळ्या सिनेमात साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. गेल्या वर्षी त्यांच्या रिलीज झालेल्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

Gandhi Movie
Bollywood News: जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाच्या याचिकेवर २ फेब्रुवारीला होणार फैसला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com