
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मराठीसोबतच हिंदीमध्येही अनेक भूमिका साकारल्या. . चित्रपट असो, मालिका असो किंवा नाटक असो या तिन्ही क्षेत्रात रोहिणी यांनी आपली छाप पाडली. त्यांच्या हिंदीमधील भूमिका या निवडक होत्या. त्यामुळे त्या सगळ्यांच्या लक्षातदेखील राहिल्या. अशीच त्यांची गाजलेली भूमिका म्हणजे 'अग्निपथ' या चित्रपटातील. या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. आता त्या भूमिकेबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.