

Marathi News : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ चित्रपटातील नवे रोमँटिक गाणे ‘मन जुळले’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेमाच्या हळुवार भावना मांडणारे हे गाणे रिलीज होताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या गाण्यात संभाजी ससाणे आणि शितल पाटील या जोडीच्या प्रेमप्रवासाची सुंदर झलक पाहायला मिळते.