

Rubab Movie Romantic Song
esakal
Marathi Entertainment News : झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही हटके टॅगलाईन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून चित्रपटाबद्दलची चर्चा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या रुबाबदार आणि स्टायलिश लव्हस्टोरीतील पहिलं प्रेमगीत ‘कसं तरी होतंया रं’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.