Rubab Movie Trailer Out
esakal
Premier
'रुबाब'च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक
Rubab Movie Trailer Out : रुबाब या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. कोण आहेत या सिनेमात कलाकार जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीचे, काळाशी सुसंगत प्रयोग सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक डॅशिंग, स्टायलिश आणि मनाला भिडणारी लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या बहुप्रतीक्षित ‘रुबाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्याच क्षणापासून ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.

