
आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. रुपालीने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही मालिकांमध्ये स्वतःचा ठसा उमटवलाय. 'बडी दूर से आए हैं' या मालिकेमुळे ती चांगलीच गाजली. तर 'आई कुठे काय करते' मधून ती घराघरात पोहोचली. आता ती लवकरच स्टार प्रवाहच्या 'लपंडाव' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात ती नकारात्मक भूमिकेत दिसतेय. अशातच आता तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. ती एका व्यक्तीला डेट करत असल्याचं सांगितलं आहे.