Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

Rupali Ganguly: जाणून घेऊयात रुपाली गांगुली यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल स्टोरीबद्दल...
Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

Rupali Ganguly: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांनी नुकताच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. रुपाली यांनी विविध मालिकांमध्ये काम करुन छोटा पडदा गाजवला. आता त्या राजकारण्याच्या रिंगणात उतरल्यानं अनेकांचे भूवया उंचावल्या आहेत. रुपाली यांच्या अनुपमा या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेतील त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. रुपाली त्यांच्या मालिकांमुळे चर्चेत असतात पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल, जाणून घेऊयात रुपाली गांगुली यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल स्टोरीबद्दल...

'साराभाई व्हर्सेस साराभाई' मुळे मिळाली लोकप्रियता

रुपाली गांगुली यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेतील मोनिषा या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेत रत्ना पाटक शाह, सतीश शाह, सुमीत राघवन, राजेश कुमार या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.

हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला अन् वेट्रेस म्हणून केलं काम

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही काळ काम केल्यानंतर, त्या या इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्या. त्यांनी दादर केटरिंगमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्यास सुरुवात केली. नंतर, त्यांनी विविध बुटीकमध्ये काम केले आणि त्यांनी वेट्रेस म्हणून देखील काम केलं.

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल
Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतलं कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

रुपाली गांगुली यांनी 2013 मध्ये अश्विन के वर्मा यांच्यासोबत लग्न केले. त्यांना रुद्रांश नावाचा मुलगा आहे. रुपाली गांगुली या अनुपमा या मालिकेमधून घराघरात पोहोचल्या.

भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे रुपाली गांगुली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

रुपाली गांगुली यांनी 'या' चित्रपटात केलं काम

दो आंखें बारह हाथ,अंगारा,सतरांगी पॅराशूट या चित्रपटांमध्ये रुपाली यांनी काम केलं. तसेच त्यांनी जिंदगी...तेरी मेरी कहाणी,कहानी घर घर की, सपना बाबुल का... बिदाई या मालिकांमध्ये देखील काम केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com