

RUTUJA BAGWE ON ANANYA MOVIE REPLACEMENT
ESAKAL
नाटक, मालिका आणि चित्रपटात कलाकार हे कधीकधी ऑडिशनद्वारे घेतले जातात तर कधी कधी त्यांची थेट निवड होते. दिग्दर्शक निर्मात्यांना एखादा कलाकार एखाद्या भूमिकेसाठी योग्य वाटला तर ती भूमिका त्यांना ऑफर होते. मात्र इंडस्ट्रीमध्ये रिजेक्शन आणि रिप्लेसमेंटदेखील अगदी सहज होते. कलाकारांना अशा घटनांना अनेकदा सामोरं जावं लागतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेदेखील तिचा रिप्लेसमेंटचा अनुभव शेअर केलाय. ऋतुजाने 'अनन्या' या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालेलं. मात्र जेव्हा या नाटकावर चित्रपट बनवण्यात आला तेव्हा मात्र ऋतुजाऐवजी हृता दुर्गुळे हिची निवड करण्यात आली. आता या रिप्लेसमेंटबद्दल ऋतुजाने भाष्य केलंय.