

sachin goswami in maza chhakula
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील स्किट पाहून प्रेक्षक खळखळून हसतात. हे स्किट लिहिणारे आणि बसवून घेणारे तसेच या कार्यक्रमाचं दिग्दर्शन करणारे लोकप्रिय लेखक सचिन गोस्वामी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी महेश कोठारे यांच्या 'माझा छकुला' या चित्रपटात हमालाची भूमिका केली होती. यात ते निवेदिता सराफ आणि आदिनाथ कोठारे यांचं सामान घेऊन जाताना दिसले होते. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सचिन यांनी त्यांना ही भूमिका कशी मिळालेली याबद्दल सांगितलंय.