
प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर हे खर्रा सेंटरवर गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खर्रा कसा तयार होतो हे सचिन पिळगांवकर तिथं पाहतात. यावेळी खर्रा सेंटरवरील तरुण त्यांना खर्रा घोटूनही देतो. त्यात काय काय घातलं जातं याचीही माहिती देतो. शेवटी हातावर थोडासा खर्रा घेऊन त्याचा वासही ते घेतात. पण खर्रा आजिबात खाल्ला नाही पाहिजे असंही ते आवर्जनू सांगतात. खरंतर एका चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने फिरताना ते चित्रपटाच्या सेटवरील ठिकाणांना त्यांनी भेट दिलीय. तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर येतेय.