

sachin pailgaonkar
esakal
बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स आणि त्यांचे रिलेशनशिप प्रेक्षकांना काही नवीन नाहीत. प्रेक्षक आपल्या आवडत्या चाहत्यांबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. असंच एक गाजलेलं रिलेशन म्हणजे सचिन पिळगावकर यांचं. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारे लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. आता ते सुप्रिया पिळगावकर यांच्याशी लग्न करून सुखी संसार करत असले तरी त्यांचं एका अभिनेत्रीसोबतचं नातं चांगलंच गाजलं होतं. ती एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.