
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आजही मोठ्या आवडीने पाहिला जातो. प्रेक्षक तर या कार्यक्रमाचे जुने स्कीटदेखील रिपीटवर पाहतात. यापूर्वी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारांचं कौतुक केलं होतं. तेव्हा अमिताभ स्वतः अभिनेता समीर चौघुले याच्या पाया पडले होते. समीर चौघुले सध्या त्याच्या 'गुलकंद' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक किस्सा सांगितला आहे, जेव्हा सचिनने समीर यांचं कौतुक केलेलं.