
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेंस, मिस्ट्री या जॅानरची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून असाच एक रहस्यांनी भरलेला ‘असंभव’ हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये दिसणारी थरारक दृश्यं, गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट रहस्यपट असल्याचा अंदाज येतोय. मात्र या सगळ्यामागे नक्की काय रहस्य दडले आहे, याचा उलगडा येत्या २१ नोव्हेंबरलाच होणार आहे.