

ASAMBHAV
ESAKAL
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक सचित पाटील आता 'असंभव' हा चित्रपट घेऊन येत आहे. रहस्य आणि गुढ यांनी भरलेला हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. २१) प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन सचितनेच केले असून, मुख्य भूमिकाही त्यानेच साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती सचित आणि नितीन वैद्य यांनी मिळून केली आहे. तसेच शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. पुनर्जन्म, खून-गूढ आणि मानसिक संघर्ष यांच्याभोवती फिरणाऱ्या या कथेत सचित पाटील आणि मुक्ता बर्वे दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. त्याचसोबत प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांसारखे दमदार कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता सचित पाटील याच्याशी केलेली बातचीत...