

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत काही चित्रपट असे असतात, जे काळाच्या पुढे जाऊनही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून बसतात. १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘साडे माडे तीन’ हा त्यातलाच एक. साधी गोष्ट, निरागस विनोद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांच्या मनात घर करणारे कुरळे ब्रदर्स, यामुळे हा चित्रपट आजही आठवणीत ताजा आहे आणि आता जवळपास दोन दशकांनंतर, हीच जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.