Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

DAUGHTER SAI MANJREKAR REACTION ON MEDHA MANJREKAR CANCER: लोकप्रिय अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरबद्दल सांगितल्यावर त्यांची मुलगी सई मांजरेकर हिने भावुक प्रतिक्रिया दिलीये.
medha manjrekar

medha manjrekar

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी एक पोस्ट करत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. मेधा यांना कर्करोगाचं निदान झालं असून त्यांची किमोथेरपी सुरू आहे. त्यासाठी त्यांनी केसही कापलेत. त्यांनी स्वतः एक पोस्ट करत ही माहिती दिली. सोबतच त्यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले ज्यात त्यांचे केस पूर्णपणे कापलेले फोटो आहेत. ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’, ‘काकस्पर्श’ अशा अनेक सिनेमात त्यांनी त्यांच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. मात्र आता कर्करोगाचं निधन झाल्यानंतर त्यांचे चाहते मात्र चिंतेत पडलेत. अशातच मेधा यांच्या मुलीनेदेखील त्यांचा फोटो शेअर करत त्यांच्यासाठी पोस्ट केलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com