

SAI MANJREKAR ON MAHESH MANJREKAR
ESAKAL
मराठीसोबतच सिनेसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन, निर्माते अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत छाप पाडली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले. त्यांची मुलगी सई मांजरेकरदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत सक्रीय झालीये. तिने देखील स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केलाय. अशातच सईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या बाबांची एक सवय सांगितली आहे जी ऐकून असं का असा प्रश्न अनेकांना पडलाय. याच मुलाखतीत तिने त्यामागचं कारणही सांगितलंय.