
sai tamhankar
esakal
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी आणि आपल्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये दिसतेय. गेली अनेक वर्ष ती हास्यजत्रामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतेय. या सोबतच ती अनेक चित्रपटात देखील दिसते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अनेकांचा आवडता आहे. या कार्यक्रमात अनेक स्कीट सादर केले जातात. जे पाहून प्रेक्षक पोट धरून हसतात. त्यावर सई आणि प्रसाद ओक प्रतिक्रिया देतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सईने खरंच कार्यक्रमादरम्यान नेमकं काय घडतं याबद्दल सांगितलं आहे.