

sai tamhankar on amruta khanvilkar
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर प्रेक्षकांची लाडकी आहे. तिने अनेक मराठी हिट चित्रपटात काम केलंय. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे देखील अनेक चाहते आहेत. सईसोबतच अभिनेत्री अमृता खानविलकर देखील मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिनेदेखील हिंदी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवलाय. मात्र सई आणि अमृता फारशा एकत्र दिसत नाहीत. त्या एकमेकींसोबतचे फारसे फोटोदेखील शेअर करत नाहीत. आता सईने त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.