

sai tamhankar
esakal
अभिनेत्री सई ताम्हणकरने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर विविध रूपांत दिसणारी सई खऱ्या आयुष्यात मात्र बिनधास्त आणि डॅशिंग आहे. पण तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी ऐकल्या तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण सईला कोणताही हटके पदार्थ नव्हे, तर साधं पिठलं आवडतं. विशेष म्हणजे तिला सांगलीचं खास दुधातलं पिठलं खूप आवडतं. या पदार्थाची रेसिपीही तिने एका पॉडकास्टमधील मुलाखतीत सांगितली आहे.