Saif Ali Khan attack accused caught in CCTV at Dadar railway station : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला झाला. त्याच्यावर चाकूने सहा वेळा वार करण्यात आले. या घटनेला ४८ तासांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही. अशात आता आरोपीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ दादर रेल्वेस्थानकाबाहेरचा असल्याची माहिती आहे.