आधी चाकूहल्ला, आता पुन्हा जीवे मारण्याची धमकी! सैफ अली खानला धमकी देणारी व्यक्ती कोण?

SAIF ALI KHAN RECEIVES DEATH THREAT: अभिनेता सैफ अली खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी झीशान अख्तरचं नाव चर्चेत आहे.
SAIF ALI KHAN

SAIF ALI KHAN

esakal

Updated on: 

WHO THREATENED SAIF ALI KHAN: बॉलिवूड कलाकारांना गेल्या अनेक दिवसापासून धमक्या येताना पहायला मिळताय. सलमान खानपासून ते अंशुमन खुरानापर्यंत अनेकांना धमक्या आल्या आहेत. दरम्यान आता अभिनेता सैफ अली खान याचही नाव जोडलं गेलय. मुंबई पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार सैफला सुद्धा धमकी मिळाली आहे. आता या प्रकरणात बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी झीशान अख्तरचं सुद्धा नाव समोर आलय.

Loading content, please wait...