सैफ अली खानवर 16 जानेवारीला त्याच्याच घरात हल्लेखोराने चाकूने हल्ला केला होता. हल्लेखोराने सैफवर तब्बल 6 वार केले होते. दरम्यान सैफला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्या शरिरात अडकलेल्या चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला. दरम्यान आता सैफच्या तब्यतीत सुधारणा झाली असून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. माध्यमांची नजर चुकवून सैफ अली खान लीलावती रुग्णालयातून मागच्या आऊट गेटने घरी गेला आहे.