बाबो! सैफ अली खानने करीनाच्या एक्स बॉयफ्रेंडला मारली मिठी; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

SAIF SHAHID KAPOOR VIRAL VIDEO: करीना कपूरचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सैफ शाहिदला हसत मिठी मारताना दिसतोय. पाहा व्हिडीओची चर्चा का होतेय.
SAIF SHAHID KAPOOR VIRAL VIDEO

SAIF SHAHID KAPOOR VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

BOLLYWOOD CELEBRITY VIRAL VIDEO: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे काही वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये राहिले. पण काही कारणास्तव वेगळे झाले. तरीही त्यांच्या मैत्री कायम आहे. कलाकारांचं ब्रेकअप आणि त्यानंतर जुनं सगळं विसरून नवीन नातं निर्माण करणं अनेकांना आव्हानात्मक असतं. त्यातील एक जोडी म्हणजे करीना कपूर आणि शाहिद कपूर. यांनी जवळपास ४ वर्ष एकमेकांना डेट केलं. परंतु काही कारणास्तव दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. शाहिदने मीरा राजपूतसोबत लग्न केलं तर करीना सैफ अली खानसोबत सेट झाली. दरम्यान अशातच सोशल मीडियावर शाहिद आणि सैफचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तो पाहून चाहते प्रचंड शॉक झालेत.

Loading content, please wait...